एसआरए मधील रहिवाशांची MURU संक्रमण इमारतीतील

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतीमधील तसेच संक्रमण शिबिरासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतीतील सदनिकांमधील रहिवाशी खरोखर पूरग्रस्त आहेत का?, तसेच याठिकाणी सदनिका मिळविण्यास ते पात्र आहेत की अपात्र याची तपासणी करून, अनधिकृतरीत्या सदनिका बळकविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याकरिता एसआरए प्रशासनाने कंबर कसली आहे. याकरिता सर्व सदनिकाधारकांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे. __ आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे शेकडो झोपड्या बाधित झाल्याने, पुन्हा एकदा झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला, पूरबाधितांचे पुनर्वसन करताना काहींनी यात हात धुऊन घेत सदनिकांवर ताबा मिळविल्याचे आढळून आले. परिणामी, एसआरए प्रशासनाने राजेंद्रनगर येथे अनधिकृतरीत्या प्रवेश करणाऱ्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेतली, हीच परिस्थिती एसआरएच्या अन्य इमारतीतअथवा संक्रमण शिबिराकरिता वापरण्यात येत असलेल्या इमारतीत आढळून आली आहे. तसेच अनेक पात्र ठरलेले झोपडपट्टीवासीयही सदनिकाप्राप्तीची ऑर्डर मिळालेली नसतानाही अनधिकृतरीत्या सदनिका ताब्यात घेतल्याचे आढळून आले. यामुळे या सर्व बाबींची तपासणी होणार असून, ज्या कोणी अनधिकृतरीत्या या घरांमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसआरएकडून सांगण्यात आले, आजपावेतो ज्या झोपडपट्टीधारकांना एसआरएमध्ये घरे मिळाली आहेत, त्यांची सर्व माहिती गोळा करून, प्रत्येक सदनिकाधारकाचे 'डिजिटल रेकॉर्ड' तयार केले जाणार आहे. यापूर्वी हा प्रयोगन झाल्याने अनेक अपप्रवृत्तीचे फावले गेल्याचे आढळन आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, एसआरएक्कडून स्यार करण्यात येणाऱ्या "डिजिटल रेकॉर्डमध्ये सदर सदनिकाधारकाची पूर्वी रहिवास असलेली झोपडपट्टी कधीपासून होती, त्याच्या रहिवास किती वर्षे तेथे होता, त्याच्याकुटुंबातील संख्या किती, अधिकृत पुरावे दिले आहेत का, आदी बाबी नोंदविण्यात येणार आहे. याचबरोबर संबंधिताच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही या रेकॉर्डमध्ये राहणार आहे, जेणे करून त्या लाभार्थी कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा सदनिका घेता येणार नाही याची खबरदारीही घेतली जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने सन | २००५ पासून आजपावेतो ८ हजार ३४३ झोपडपट्टीधारकांना घरे देण्यात आली आहेत, यामध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत. तेच या सदनिकांमध्येआजमितीला राहत आहेत का?, का त्यांनी ते भाडेतत्त्वावर दिले आहे? याचीही तपासणी केली जाणार आहे. यामध्ये लाभार्थी सदनिकाधारकाने भाडेकरू ठेवला असल्याचे आढळून आल्यावस्त्याच्यावरही कारवाई होणार आहे. घर मिळूनही परत आलेल्यांची पाहणी होणार : रुबल अगरवाल झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरएच्या) इमारतींमध्ये किंवा बीएसयूपीमध्ये iiiiiiiiiiiiiiim ज्यांना घरे मिळाली असतानाही, संबंधित लाभार्थी पुन्हा झोपडपट्टीत राहण्यास आले असल्यास त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली, आंबिल ओढ्या आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या झोपडपटट्यांमधील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या, डिजिटल रेकॉर्डमुळे अनधिकृतांचे चेहरे समोर येणार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने सन २००५ पासून ८ हजार ३४३ लाभार्थ्यांना घरे दिली गेली आहेत; तसेच नव्यानेही काही योजनांमध्ये घरे देण्याची प्रक्रिया चालू आहे. हे काम करीत असतानाच आता प्राधिकरणाने या सर्वांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याचे ठरविले आहे. यामुळे अनधिकृतरीत्या घुसलेल्यांवर कारवाई होऊन, खऱ्या लाभाथ्यांना त्याचा लाभ मिळेल व नियमामध्ये बसणाऱ्या ; तसेच अधिकृत पुराव्याच्या आधारावर पात्र झोपडपट्टीधारकाला न्याय मिळेल, असे एसआरए प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले, दरम्यान, एसआरए योजनेत ज्या विकसकाला काम दिले गेले होते, त्या विकसकाने पात्र व्यक्तींव्यतिरिक्त दुसऱ्यांनाच घरे दिल्याचे आढळून आल्यास, त्या विकसकाचे (डेव्हलपर्सचे) एसआरए लायसन्सही रद्द करण्यात येणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले..