वर्धा : जिल्ह्यातील तळेगांव नजीक असलेल्या मुरलीधर अग्रवाल ढेप सरकी च्या मिलमध्ये कामावर असलेला युव राहल गणपत वलके वय २१ वर्ष आज नेहमीप्रमाणे मिल मध्ये कामावर गेला होता. तो काम करत असताना पाणी पिण्यासाठी गेल्यावर पाणी पित असताना पाण्याच्या मडक्याजवळच असलेल्या ताराच्या कुंपणाला त्याचा हात लागला. या ताराच्या कुंपणाजवळुन एका मंदिरात वीज कनेक्शन घेतले होते. जे पूर्णतः उघडे जीवहानी असल्याने त्याचा वीजप्रवाह ताराच्या आता कुंपणात आल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसआगोदार सुद्धा याच ठिकाणी एका कामगाराला विजेचा शॉक लागला होता, त्यावेळी मिल मालकाला कामगारांनी याबाबत अवगत केले होते. तरीसुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आली नव्हती. यावेळी कामावर असलेल्या बाकीच्या कामगारांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित केले. घटनेच्या ठिकाणी काही विजेचे वायर हे पडून होते. तर मिल जवळ असलेल्या विद्युत रोहित्रचे झाकण देखील उघडेच होते. सदरचा अपघात कोणाच्या हलगर्जीपणा मुळे झाला हे नक्की कळू शकले नसले तरी सदरच्या ठिकाणी सुरक्षेचा मोठा अभाव दिसून आला.
कामगार युवकाचा मृत्यू -विजेच्या धक्क्याने