यांची स्तुती केली. अच्युत पालव यांनी सुलेखनासाठी केलेलं काम अफाट आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. २६ जुलैचा जो पाऊस मुंबईत झाला होता त्यावेळी त्यांचं अनेक साहित्य भिजलं. मात्र त्यांनी सुलेखनासाठीची मेहनत सुरुच ठेवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.माझं अक्षर चांगलं आहे याचं महत्त्वाचं कारण सध्या भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्कील शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केलं. अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
भारतात फक्त 'मोदी' लिपी दिसते - राज ठाकरे यांचा मिश्किल अंदाज.