आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज व्यापक बैठक.

लातूर(प्रतिनिधी): लातूर महानगरपालिकेच्या सोमवार दि. २० जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधरण सभेत शहरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घेतलेला आहे. मात्र यापुर्वीच या नाट्यगृहास भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी असे नाव देण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे.